परीक्षेच्या पूर्वी अंतिम क्षणी घ्यायची काळजी…
१) आदल्या दिवशीच बॅग भरून ठेवा त्यामध्ये हॉल तिकीट ठेवा
२) लवकर झोपा
३) व्यवस्थित जेवण घ्या भूक नसेल तर फ्रुट ज्यूस घ्या
४) किटकीट करणारे नातेवइकांच्या फोन ला उत्तर देऊ नका
५) जेवढे जमेल तितके च वाचा
६) आदल्या दिवशी सगळं उजळणी करणे टाळा
७) शेवटच्या क्षणी परीक्षेला जाताना रेविजन करू नका, तसेच त्या विषयाचे चर्चा करू नका
८) सर्व सिलॅबस चा विचार न करता जे वाचत आहोत त्यावर लक्ष द्या
९) साधे सुती हलके कपडे वापरा, फॅन्सी किंवा अवजड पोशाख करू नका
१०) सोशल नेटवर्किंग साईट्स पासून दूर रहा
११) मित्रांना मनापासून शुभेच्या द्या, मन हलके होईल
१२) नर्वस मित्रणापासून लांब रहा
१३) आपल्या पाल्यास अश्या वेळी उपदेश देणे टाळा
१४) परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका
१५) पेपर फुटणे किंवा महत्त्वाचे प्रश्न यामागे धावू नका
१६) सारखे वारंवार शिक्षकानं भेटत राहू नका
१७) परीक्षा केंद्रावर वेळेअगोदर पोहचा, शक्यतो स्वतः ड्रायव्हिंग करणे टाळा
१८) तुमचा विश्वास असेल तर प्रार्थना करा
१९) पेपर मिळण्यापूर्वी थोडा मोठा आणि सावकाश श्वास घेत रहा
२०) प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर थोडी विश्रांती घ्या
२१) जे चांगले येते ते सुरुवातीला लिहा
२२) पेपर चालू असताना इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करू नका
२३) काही आठवत नसेल तर दीर्घ श्वास घ्या आणि शांत रहा
२४) एका प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पुढचा प्रश्न सोडवा
२५) पेपर संपल्यावर तपासून पहा
२६) बाहेर आल्यावर उत्तरांची चर्चा करणे टाळा
२७) पुढच्या विषयाचे विचार चालू करा
२८) परीक्षा चालू असताना परीक्षा झाल्यानंतर चे इंजोयमेंट चे नियोजन करू नका
२९) जागे राहण्यासाठी अती प्रमाणात चहा किंवा कॉफी सेवन करू नका
३०) तुम्हाला काय येते काय येत नाही याचा अंदाज घ्या, आणि जे अवघड वाटते ते सोडून द्या
३१) परीक्षेच्या काळात जास्त टीव्ही पाहू नका
३२) भरपूर पाणी प्या आणि फळे भाज्या खा
३३) अभ्यास करत असताना मित्रांना फोन करत बसू नये
३४) दर ४५ मिनिटांनी १० मिनिटे ब्रेक घ्या तेव्हा फोन करून घ्या
३५) ब्रेक मध्ये टीव्ही रिमोट ल हात लावू नका
३६) घरचे जेवण घ्या बाहेरचे जेवण टाळा
३७) ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याशी तुमच्या मनातील परीक्षेबाबत भावना बोलून दाखवा
३८) दिवसातून नियमित अंघोळ करा पाहिजे तर दोन वेळा पण करा
३९) जेव्हा तणाव जाणवेल तेव्हा व्यायाम करा, गाणी ऐका, किंवा रिलक्ससेशन एक्सरसाइज करा
४०) एखादे पान वाचून संपत नसेल तर पुढचे पान चालू करा
४१) सिगारेट, दारू किंवा इतर नशा करता कामा नये
४३) मित्र, मैत्रीण यांच्या संपर्क मध्ये राहण्याने चांगले वाटत असेल तर राहू शकता
४४) पालक, घरचे सदस्य यांच्यासोबत हसी मजाक करत रहा
४५) जेवण करताना अभ्यासाबद्दल बोलू नका
४६) घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी पालकांना विनंती करा
४७) लहान मुलांसोबत बसून छान वाटत असेल तर तसा अभ्यास करा अन्यथा टाळा
४८) दररोज ३० मिनिटे खेळायला जा, जखमा होतील असे खेळ टाळा
४९) आजार टाळण्यासाठी माच्छरदानी वापरा
५०) पुढच्या एडमिशन ची चिंता करू नका
५१) दुपारी जास्त झोपू नका, रात्री मात्र सलग ७ तास झोप घ्या
५२) पेपर अवघड गेला तर मित्रांशी, शिक्षकांशी, त्याबद्दल बोलून मन हलके करा
जर झोप येत नसेल, बेचैनी होत असेल, उदास, घाबरल्या सारखे, निरर्थक वाटत असेल, पळून जावेसे वाटणे असेल तर समुपदेशक किंवा मानसोपचार तजज्ञांमार्फत मदत घ्या…
परीक्षे साठी खूप खूप शुभेच्छा…
डॉ. हरीश शेट्टी...
भाषांतर डॉ. नितीन भोगे...
👌🙏
ReplyDeleteSupriya Laxman Rattiwadi
ReplyDelete