We may define tense as that form of a verb which shows the state of an action/event.
In English language there are main three (3) types of tense
Present Tense (वर्तमान काळ)
Past Tense (भूतकाळ)
Future Tense (भविष्य काळ)
वरील (3) प्रमुख काळांचे प्रत्येकी चार-चार उपप्रकार (उपकाळ) पडतात
Simple Tense:- साधा काळ
Continuous or imperfect or Progressive Tense:- चालू किंवा अपूर्ण काळ
Perfect Tense:- पूर्ण काळ
Perfect-Continuous Tense:- पूर्ण-चालू काळ
म्हणजेच 3 मुख्य काळ आणि त्याचे प्रत्येकी चार-चार उपकाळ असे एकूण: 3 x 4 = 12 काळ इंग्रजीत आहेत.
त्यांचा अभ्यास खालील प्रमाणे करूया:
I Simple Tense (साधा काळ)
१ Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)
रचना:
S + V1 + O = S
कर्ता + क्रियापदाचे मूळ रूप + कर्म = वाक्य
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I go (मी जातो) | We go आम्ही जातो |
Second (दि.पु) | You go (तु जातो) | You go (तूम्ही जाता) |
Third (तृ.पु) | He goes (तो जातो) | They go (ते, त्या, ती.इ सर्वजण जातात) |
Rules/ नियम:
कर्त्यापुढे नुसते क्रियापद ठेवले असता साधा वर्तमान तयार होतो. परंतु वर्तमानकाळी तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामे (He, she, It) व त्याच्यापुडे क्रियापदाला (S) किंवा (es) प्रत्यय लागतो.
जर क्रियापदाच्या शेवटी व्यंजन असेल तर क्रियापदाला शेवटी (S) प्रत्यय लावावा
जर क्रियापदाच्या शेवटी (a, e, i, o, u) किंवा (S, Sh, Ch, O, X) इ अक्षरे असतील तर क्रियापदाला शेवटी (es) प्रत्यय लावावा (लागतो)
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा:- जेव्हा वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया नेहमीची रीत किंवा पध्दत दर्शवित असेल तेंव्हा साधा वर्तमान काळ वापरतात
2 Simple Past Tense (साधा भूतकाळ)
रचना:
S + V२+ O= S
कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप + कर्म = वाक्य
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I went (मी गेलो) | We went (आम्ही गेलो) |
Second (दि.पु) | You went (तू गेलास.) | You went (तुम्ही गेले) |
Third (तृ.पु) | He went (तो गेला) | They went (ते, त्या, ती इ सर्वजण गेले) |
Rules/ नियम:
साधा भूतकाळ बनविताना प्रत्येक कर्त्यापुढे क्रियापदाचे दूसरे रूप (V2) ठेवले असता साधा भूतकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया नुकतीच घडून गेलेली असते तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात.
3 Simple Future Tense (साधा भविष्यकाळ)
रचना:
S + to be (shall/will) + V1 + O= S
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I shall go (मी जाईन) | We shall go (आम्ही जाऊ) |
Second (दि.पु) | You will go (तू जाशील) | You will go (तुम्ही जाल) |
Third (तृ.पु) | He will go (तो जाईल) | They will go (ते त्या ती इ सर्वजण जातील) |
Rules/ नियम:
साधा भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भविष्यकाळी रूपे (shall/will) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन क्रियापदाचे मुळरुप (V1) वापरावे अशा प्रकारे साधा भविष्यकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा? जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया घडणार असेल तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात.
II Continuous Tense (चालू काळ)
४ Present Continuous Tense (चालू/अपूर्ण वर्तमानकाळ)
रचना:
S + to be (am, is, are) + V + ing + O = S
(to be ची वर्तमान काळी रूपे:- am, is, are.)
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I am going (मी जात आहे) | We are going (आम्ही जात आहोत) |
Second (दि.पु) | You are going (तू जात आहेस) | You are going (तूम्ही जात आहात) |
Third (तृ.पु) | He is going (तो जात आहे) | They are going (ते, त्या, ती इ. सर्वजण जात आहेत) |
Rules/ नियम:
चालू किंवा अपूर्ण वर्तमानकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची वर्तमानकाळी रूपे- am, is, are) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात चालू आहे म्हणजेच ती पूर्ण नाही म्हणजेच ती अपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा एखादी क्रिया चालू आहे म्हणजेच ती पूर्ण नाही म्हणजेच ती क्रिया अपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो.
५ Past Continuous Tense (चालू/ अपूर्ण भूतकाळ)
रचना:
(To be चा भूतकाळी रूपे:- was, were)
S + to be (was, were) + V + ing + O = Sentence
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I was going (मी जात होतो) | We were going (आम्ही जात होतो) |
Second (दि.पु) | You were going (तू जात होतास) | You were going (तुम्ही जात होते) |
Third (तृ.पु) | He was going (तो जात होता) | They were going (ते, त्या, ती, इ. सर्वजण जात होते) |
Rules/ नियम:
चालू किवा अपूर्ण भूतकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भूतकाळी रूपे :- was, were) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भूतकाळात चालू होती म्हणजेच पूर्ण नव्हती म्हणजेच अपूर्ण होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती म्हणजेच ती पूर्ण नव्हती म्हणजेच ती अपूर्ण होती. हे दर्शविण्यासाठी चालू - अपूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.
६ Future Continuous tense (चालू/ अपूर्ण भविष्यकाळ)
रचना:
(To be चा भाविष्यकाळी रूपे:- shall, will + be)
S + to be (shall/ will) + be + V + ing + O=S
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I shall be going (मी जात असेन) | We shall be going (आम्ही जात असू) |
Second (दि.पु) | You will be going (तू जात असशील) | You will be going (तुम्ही जात असाल) |
Third (तृ.पु) | He will be going (तो जात असेल) | They will be going (ते, त्या, ती, इ. सर्वजण जात असतील) |
Rules/ नियम:
चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भविष्यकाळ रूपे :- shall, will) व त्यापुढे (be) वापरावे ती क्रिया भविष्यकाळात चालू असेल म्हणजेच ती पूर्ण नसेल म्हणजेच अपूर्ण असेल हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. अशा प्रकारे चालू /अपूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल म्हणजेच ती पूर्ण नसेल म्हणजेच ती अपूर्ण असेल. हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळाचा वापर केला जातो.
III Perfect Tense (पूर्ण काळ)
७ Present Perfect Tense (पूर्ण वर्तमान काळ)
रचना:
Have चा साहयकारी रूपे:- have, has, had
(To be चा भविष्यकाळी रूपे:- shall, will + be)
S + have/has + V3 + + O = S
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I have gone (मी गेलेलो आहे) | We have gone (आम्ही गेलेलो आहोत) |
Second (दि.पु) | You have gone (तू गेलेला आहेस) | You have gone (तुम्ही गेलेला आहात) |
Third (तृ.पु) | He has gone (तो गेलेला आहे) | They have gone (ते, त्या, ती, इ. सर्वजण गेलेले आहेत) |
Rules/ नियम:
पूर्ण वर्तमान काळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून साहयकारी क्रियापदे ( have, has,) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला तिसरे रूप (V3) वापरावे अशा प्रकारे पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळचा उपयोग केला जातो.
८ Past Perfect Tense (पूर्ण भूतकाळ)
रचना:
Have चे भूतकाळ रूपे:- had वापरतात
S + had + V3 + + O = S
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I had gone (मी गेलेलो होतो) | We had gone (आम्ही गेलेलो होतो) |
Second (दि.पु) | You had gone (तू गेलेला होता) | You had gone (तुम्ही गेलेले होते) |
Third (तृ.पु) | He had gone (तो गेलेला होता) | They had gone (ते, त्या, तो, इ. सर्वजण गेले होते) |
Rules/ नियम:
पूर्ण भूतकाळ बनविताना सर्व कर्त्यांपुढे (have) चे भूतकाळी रूप (had) ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (P.P) (V3) वापरतात अशा प्रकार पूर्ण भूतकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती हे दर्शविण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.
९ Future Perfect Tense (पूर्ण भविष्यकाळ)
रचना:
साहयकारी क्रियापद have, (To be) ची भविष्यकाळी रूप shall, will
S + shall/will + have V3 + O = S
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I shall have gone (मी गेलेलो असेन) | We shall have gone (आम्ही गेलेलो असू) |
Second (दि.पु) | You will have gone (तू गेलेला असेन) | You will have gone (तुम्ही गेलेले असाल) |
Third (तृ.पु) | He will have gone (तो गेलेला असेल) | They will have gone (ते, त्या, ती, इ. सर्वजण गेलेले असतील) |
Rules/ नियम:
पूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वाचनाला अनुसरून (To be ची भविष्यकाळी रूपे (Shall, will) योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी (Shall, will) पुढे (have) वापरून मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (P.P) (V3) वापरतात अशा प्रकारे पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरातात:- जेव्हा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग केला जातो.
IV Perfect Continuous Tense (पूर्ण चालू काळ)
१० Present Perfect - Continuous Tense (चालू पूर्ण वर्तमान काळ)
रचना:
साहयकारी क्रियापद:- have + been/ has been
S + have/has + been + V + ing + O = S
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I have been going (मी जात आलेलो आहे) | We have been going (आम्ही जात आलेलो आहोत) |
Second (दि.पु) | You have been going (तू जात आलेला आहेस) | You have been going (तुम्ही जात आलेला आहात) |
Third (तृ.पु) | He has been going (तो जात आलेला आहे) | They have been going (ते, त्या, ती इ सर्वजण जात आलेले आहेत) |
Rules/ नियम:
चालू - पूर्ण वर्तमानकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून साहयकारी क्रियापदे :- have, has ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमानकाळात पूर्ण झाली आहे हे दर्शविण्यासाठी त्यापुढे (been) वापरावे व तीच क्रिया पुढे वर्तमानकाळत चालू असेन हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू-पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरातात:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी पूर्ण झाली आहे व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू आहे. हे दर्शविण्यासाठी चालू-पूर्ण वर्तमानकाळ वापरतात.
११ Past - Perfect - Continuous Tense (चालू - पूर्ण भूतकाळ)
रचना:
S + had + been + V + ing + O = S
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I had been going (मी जात आलेलो होतो) | We had been going (आम्ही जात आलेलो होतो) |
Second (दि.पु) | You had been going (तू जात आलेला होता) | You had been going (तुम्ही जात आलेला होता) |
Third (तृ.पु) | He had been going (तो जात आलेला होता) | They have been going (ते, त्या, ती इ. सर्वजण जात आलेले होते) |
Rules/ नियम:
चालू - पूर्ण भूतकाळ बनविताना सर्व कर्त्यांच्या (have चे भूतकाळी रूप (had) ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती हे दर्शविण्यासाठी पुढे (been) वापरावे व तीच क्रिया भूतकाळात पुढे सातत्याने चालू होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू-पूर्ण भूतकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
जेव्हा चालू पूर्ण भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली होती व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू होती हे दर्शविण्यासाठी चालू - पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.
१२ Future Perfect - Continuous Tense (चालू-पूर्ण भविष्यकाळ)
रचना:
S + to be (Shall, will) + have + been + V + ing + O = S
Person | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
First (प्र.पु) | I shall have been going (मी जात आलेलो असेन) | We shall have been going (आम्ही जात आलेलो असू) |
Second (दि.पु) | You will have been going (तू जात आलेला असशील) | You will have been going (तुम्ही जात आलेले असाल) |
Third (तृ.पु) | He Will have been going (तो जात आलेला असेल) | They will have been going) (ते, त्या, ती इ. सर्वजण जात आलेले असतील) |
Rules/ नियम:
चालू - पूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनालाअनुसरून (to be ची भविष्यकाळी रूपे shall, will) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यासाठी नुकतीच पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी त्यापुढे (have been) वापराव व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू असेल हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशाप्रकार चालू-पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
Uses/ उपयोग:
हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल व तीच क्रिया भाविष्यकाळात सातत्याने चालू असेल हे दर्शविण्यासाठी चालू पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग (वापर) केला जातो.
No comments:
Post a Comment